बाबरी निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल आज २८ वर्षाच्या प्रदीर्ग काळानंतर लागलेला आहे. आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका केलेली आहे. यावर आता शिवेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.
खासदार संजय राऊत यांनी प्रथम न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आज बाबारीचा निकाल येणार म्हणून संपूर्ण देशाचे लक्ष निर्णयाकडे लागले होते. अयोध्येतील बाबरी मशिदीचे अवशेष सापडणे हा पूर्वनियोजित कट नसून तो असामाजिक तत्वांकडून झालेली अचानक कृती आहे. असे निरीक्षण नोंदवत सीबीआयच्या विशेष न्यायालयाने नोंदवत सर्वच्या सर्व आरोपींची निर्दोष सुटका केल्यानंतर या निर्णयाचे राऊत यांनी स्वागत केले आहे.
लालकृष्ण अडवाणी, उमा भारती यांची निर्दोष सुटका झाली आहे. न्यायालयानंही म्हटलं आहे हा कोणताही पूर्वनियोजित कट नव्हता. निकालानंतर आता या गोष्टी विसरायला हव्यात. आता अयोध्येत राम मंदिर निर्माण होत आहे. बाबरीचा ढाचा पाडला नसता तर अयोध्येत राम मंदिर बनलं नसतं. शिवसेनेकडून लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांचं अभिनंदन. आम्हालाही हाच निर्णय अपेक्षित होताअशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.