Skip to content Skip to footer

शेतकरी आंदोलन ; मोदी सरकारला दिला गंभीर इशारा

शेतकरी आंदोलन ; मोदी सरकारला दिला गंभीर इशारा

दिल्ली येथे शेतकऱ्यांचे कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. त्यात रस्त्यावर असलेले ट्रॅक्टर हेच त्यांचे घर बनले आहे. दिल्ली-उत्तर प्रदेश सीमा भागात शेतकऱ्यांनी रात्रभर देशभक्तीची गाणी गायली. दिल्ली चलो ऐवजी दिल्ली घेरो अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र दिल्लीतील सरकार त्यांच्याशी दहशतवादी असल्यासारखी वागणूक देत आहे, असे आता बोलले जात आहे.

शेतकरी आंदोलनाच्या पाचव्या दिवसानंतरही शेतकरी आंदोलनाचा वेग कमी झाला नाही. सरकार शेतकऱ्यांशी बोलण्यास तयार आहे पण दिल्ली बॉर्डरवर चर्चा व्हावी यावर शेतकरी ठाम आहेत. शेतकरी दिल्ली पोलिसांनी सांगितलेल्या आंदोलनस्थळी जात नाहीत आणि दिल्ली सीमेवरून हटतानाही दिसत नाहीत. यामुळे सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

दिल्लीच्या ५ पॉईंट येथेच आंदोलन केले जाईल असे रविवारी शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये ठरले आहे. सरकारने विनाअट आमच्याशी बोलावे आणि रामलीला मैदान किंवा जंतरमंतर येथे आंदोलनाची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. पुढच्या ४ महिन्यांपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहील, असा गंभीर इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Leave a comment

0.0/5