Skip to content Skip to footer

सिने-अभिनेता प्रकाश राज यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा!

सिने-अभिनेता प्रकाश राज यांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा!

सध्या देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहेत. त्यात आज मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या १२ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

त्यात आता प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी सुद्धा शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. प्रकाश राज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या निर्णयावर टीका करत असतात. आज या संदर्भात ट्विट करून ते म्हणतात की, ‘मी भारत बंदला पाठिंबा देत आहे, तुम्ही सुद्धा या आंदोलनाला पाठींबा देत आहात ना ?’, अस म्हणत त्यांनी सर्व सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री सोनम कपूर, दिग्दर्शक हंसला मेहता, गायक दिलजीत दोसांज, सनी देओल, प्रियांका चोप्रा, प्रीती झिंटा या सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

Leave a comment

0.0/5