Skip to content Skip to footer

तोडगा काढण्याऐवजी ‘ते’ नक्की शेतकरी आहेत का असं कसं विचारता?, उर्मिला मार्तोंडकर यांची केंद्रावर टीका

तोडगा काढण्याऐवजी ‘ते’ नक्की शेतकरी आहेत का असं कसं विचारता?, उर्मिला मार्तोंडकर यांची केंद्रावर टीका

सध्या देशभरात शेतकरी कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु झाले आहेत. त्यात आज मंगळवारी शेतकरी कायद्याविरोधात विविध संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या १२ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. त्यात आज कृषी कायद्याविरोधात भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा आपला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान, मार्तोंडकर यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर असंवदेनशील असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांना आज इतका मोठा संघर्ष करावा लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. शेतकरी घरदार सोडून आबालवृध्दासह रस्त्यावर उतरले आहेत.

आज थंडीत रस्त्यावर ठिय्या मारून बसले आहेत. त्यावरून शेतकऱ्यांच्या भावना किती तीव्र आहेत हे लक्षात येईल. सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे, त्याउलट ते नक्की शेतकरी आहेत का? यापासून त्यांचे कपडे, त्यांच्या वस्तूंचे ब्रँड, ते इंग्रजी कसे बोलतात? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण आता तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सामानाला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5