Skip to content Skip to footer

नवीन संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

नवीन संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

नवीन संसद भवन उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यात येणार आहे. हे भवन उभारण्यासाठी ९७१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवरांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे नवीन संसद भवनाच्या उभारणीचे कंत्राट देण्यात आले आहे. नवीन संसद भवनाची इमारत चार मजली असणार असून, विविध सोयी-सुविधांनी सज्ज असणार आहे.

नव्याने बांधण्यात येणाऱ्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून, नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे ८८८ बैठक आसन व्यवस्था उपलब्ध असतील, तर राज्यसभा सदस्यांसाठी ३२६ पेक्षा अधिक आसन व्यवस्था उपलब्ध असतील. म्हणजेच नव्या संसद भवनात एकूण १,२२४ सदस्य एकाचवेळी बसू शकतील. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी आपण या नव्या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु करणार आहोत. अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे.

मात्र हा भूमिपूजन सोहळा नाममात्र आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बांधकाम, तोडफोड आणि झाडांचे स्थलांतर करण्यात येणार नाही, अशी हमी महान्यायवादी तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला दिली होती.

Leave a comment

0.0/5