Skip to content Skip to footer

बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, ममता दीदींचा भाजपाला इशारा

तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातील वाढ शिगेला पोहचले आहेत. त्यात काही महिन्यात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि अमित शहा यांच्यात सुद्धा जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला होता. अखेर ममता बॅनर्जी यांनीही भाजपाला प्रत्युत्तर देत पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “बंगालची भूमी जीवना स्त्रोत आहे. आपल्याला ही भूमी सुरक्षित ठेवावी लागेल. आपल्याला याचा अभिमान बाळगावा लागेल. बाहेरून येणाऱ्यांनी म्हणावं की, ही भूमी गुजरातसारखीच होऊन जाईल, असे व्हायला नको.

पुढे बोलताना ममतादीदी म्हणाल्या की, आमचा हाच संदेश आहे की, आम्ही सगळ्यांसाठीच आहोत. मानवता सगळ्यांसाठीच आहे. मग तो शीख असो, जैन असो वा ख्रिश्चन. आम्ही त्यांच्यामते फूट पाडण्याची परवानगी देणार नाही,” असं म्हणत ममतांनी भाजपावर टीका केली

Leave a comment

0.0/5