Skip to content Skip to footer

शेतकरी कृषी कायदा :भाजपाला या गावात “नो एंट्री” आलात तर चपलेचा हार घालण्यात येईल

शेतकरी कृषी कायदा :भाजपाला या गावात “नो एंट्री” आलात तर चपलेचा हार घालण्यात येईल

शेतकरी कृषी कायद्यावरून मागच्या अनेक दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे केंद्राने पारित केलेल्या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करत आहे. त्यात शेतकऱ्याच्या जीवावर उठलेले काळे कायदे लवकरात लवकर रद्द करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे.

त्यातच हरियाणातील एका गावात संतप्त ग्रामस्थांनी आपल्या गावात भाजप आणि जेजेपीच्या नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. कर्नालमधील इंद्री गावातील कादराबादच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. जर भाजप किंवा जेजेपीच्या नेत्यांनी गावात घुसण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चपलेचा हार घातला जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांनी गावाबाहेर एक बॅनर लावला आहे. जो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलेल तोच गावात राहिल, असे बॅनरवर लिहिलण्यात आले आहे. केंद्र सरकारने लागू केलेले तिनही नवीन कृषी कायदे शेतकऱ्याच्या हिताचे नाहीत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. असे त्या बॅनरवर लिहले आहे.

Leave a comment

0.0/5