Skip to content Skip to footer

भारतीय जनता पक्षाचे खासदार मनसुख वसावा यांनी ठोकला पक्षाला राम-राम

भारतीय जनता पक्षाचे खासदार मनसुख वसावा यांनी ठोकला पक्षाला राम-राम

गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनसुख वसावा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मनसुख वसावा यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. हा गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे,

भारतीय-जनता-पक्षाचे-खासद-Bharatiya-Janata-Pakshache-Khasadमागच्या काही दिवसांपासून खासदार मनसुख वसावा भाजपमधील वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते. याच नाराजीतून वसावा यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. माझ्या चुकीमुळे पक्षाला फटका बसत आहे. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे वासवा यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच गुजरात सरकारने नर्मदा जिल्ह्यातील १२१ गावांचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश केला होता. मनसुख वसावा यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते आपल्या लोकसभा सदस्यत्त्वाचाही राजीनामा देणार असल्याचे समजते.

Leave a comment

0.0/5