Skip to content Skip to footer

MSP देवू शकत नसाल तर राजीनामा द्या, शेतकरी आपल्या घरी निघून जातील

MSP देवू शकत नसाल तर राजीनामा द्या, शेतकरी आपल्या घरी निघून जातील

कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या १ महिन्यांपासून केंद्र सरकार आणि कृषी कायद्या विरोधात आंदोलन करत आहे. त्यात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा होऊन सुद्धा अद्याप तोडगा कृषी कायद्यावर तोडगा निघालेला नाही. तसेच या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळत आहे.

तर दुसऱ्या बाजूला MSP देवू शकत नसाल तर राजीनामा द्या, शेतकरी आपल्या घरी निघून जातील असं म्हणत आचार्य प्रमोद कृष्णम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकरी संघटनांकडून विरोधी पक्षांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.एका बाजूला राहुल गांधी सरकारवर टीका करत असताना दुसऱ्या बाजूला भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी जर विरोधी पक्ष मजबूत असता तर शेतकऱ्यांना आंदोलनाची काय गरज होती?असं म्हणत विरोधकांना देखील खडेबोल सुनावले आहेत.

Leave a comment

0.0/5