Skip to content Skip to footer

सीबीआय पाठोपाठ ईडीला तपासासाठी घ्यावी लागणार परवानगी – अनिल देशमुख

सीबीआय पाठोपाठ ईडीला तपासासाठी घ्यावी लागणार परवानगी – अनिल देशमुख

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद झालेले पाहायला मिळाले होते. सीबीआयच्या मार्फत केंद्र सरकार राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप लावण्यात आला होता.

याच पाश्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयला विना परवानगी राज्यात चौकशी करण्यावर बंदी घातली होती. त्यापाठोपाठ राज्यात आघाडीच्या नेत्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलेले पाहायला मिळाले होते. तसेच पुन्हा एकदा ईडीचा वर करून राज्यातील सरकारवर केंद्र सरकार वचक ठेवत असल्याचा आरोप लावण्यात आला होता.

त्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व प्रकारावर आक्षेप घेत तीव्र प्रतिक्रिया देत राज्यात चौकशीसाठी सीबीआयवर परवानगीचं बंधन घालण्यात आले आहे. त्याचा उल्लेख देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रियेत केला असून ईडी बाबतही राज्य सरकार असे पाऊल उचलणार असल्याचे संकेत देशमुख यांनी दिले आहेत.

Leave a comment

0.0/5