Skip to content Skip to footer

राज्यघटनेचा अभ्यास करा, माजी सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांचे योगीजींना खुले पत्र

राज्यघटनेचा अभ्यास करा, माजी सेवानिवृत्ती अधिकाऱ्यांचे योगीजींना खुले पत्र

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना १०४ यांना सनदी अधिकाऱ्यांनी पत्र लिहून ‘लव्ह जिहाद’ कायद्यासंदर्भात चिंता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘लव्ह जिहाद’ कायद्यामध्ये बळजबरीने धर्मांतर केल्यास कारागृहात पाठवण्याची तसंच दंडाची तरतूद आहे.

या सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात मोराबादमध्ये अटक करण्यात आलेल्या घटनेचा उल्लेख केला आहे. हिंदू तरुणीशी विवाह केल्यामुळे मोरादाबादमध्ये दोन मुस्लीमधर्मीय भावांना पोलिसांनी अटक केली होती. यादरम्यान तरुणीचा गर्भपात झाला. पत्रामध्ये तरुणीने आपल्या आपल्या संमतीने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केले असतानाही बजरंग दलाकडून ‘लव्ह जिहाद’ असा आरोप केल्याचा उल्लेख आहे.

पुढे अधिकाऱ्यांनी तिखट शब्दात योगीजींना प्रश्न विचारत टोला लगावला आहे. ““जन्माला येण्याआधीच एका निर्दोष बालकाची झालेली ही हत्या नाही का? तुमच्या राज्यातील पोलीस यासाठी जबाबदार नाहीत का?, अशी विचारणा करत उत्तरप्रदेशातील कायदा आणि व्यवस्थेवर बोट केले आहे.

Leave a comment

0.0/5