Skip to content Skip to footer

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून गांधी परिवाराचा छळ करण्याची ही पद्धत योग्य नाही – सामना

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून गांधी परिवाराचा छळ करण्याची ही पद्धत योग्य नाही – सामना

”राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत” असा प्रचार करूनही गांधी अद्याप उभेच आहेत व मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल.

देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना वाटते. लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते व हा एकटा योद्धा प्रामाणिक असेल तर भय शंभर पटीने वाढत जाते.अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक करण्यात आले आहे.

पुढे सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे की, राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. भाजपला मोदींशिवाय व काँग्रेसला गांधींशिवाय पर्याय नाही हे सत्य स्वीकारावे लागेल. काही काळासाठी गांधी दूर जाताच पक्ष होता त्यापेक्षा जास्तच खाली घसरला.

त्यात पुन्हा गांधी घराण्यातील व्यक्ती येत आहे.अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी होकार दिला आहे ही बातमी पक्की होताच दुसऱ्य़ा बाजूला प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या घरी आयकर विभागाचे पथक पोहोचले, म्हणजे वढेरा यांच्या घरावर आयकर विभागाने ‘रेड’ टाकली. हा योगायोग नक्कीच नाही. रॉबर्ट हे सोनिया गांधी यांचे जावई आहेत हे सोडा, वढेरा यांच्याबाबत अनेक विवाद आणि प्रमादही आहेत, पण तरीही केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी गैरवापर करून गांधी परिवाराचा छळ करण्याची ही पद्धत योग्य नाही असा आरोपही शिवसेनेने भाजपावर केला आहे.

Leave a comment

0.0/5