Skip to content Skip to footer

भारतीय हद्दीत चीननं वसवलं गाव, सेटलाईट फोटोमधून आलं समोर

भारतीय हद्दीत चीननं वसवलं गाव, सेटलाईट फोटोमधून आलं समोर

गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीन लष्करांमध्ये झालेल्या संघर्षानंतर लष्करी आणि राजनैतिक स्थरावर या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र ही चर्चा सुरु असताना पुन्हा चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करत अरुणाचल प्रदेशात एक गावच वसवले आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशात गाव वसवल्याची माहिती सॅटेलाईट फोटोतून समोर आली होती. चीननं तब्बल १०१ घरं बांधली असून, भारतीय सीमेपासून साडेचार किमी आतमध्ये येऊन चीननं हे बांधकाम केल्याची माहिती एनडीटीव्ही या प्रसिद्ध वृत्तसमूहाने दिलेली आहे.

सॅटेलाईट फोटोतून दिसून आलेल्या दृश्यात चीननं अरुणाचलमध्ये हे गाव वसवलं असून, एनडीटीव्हीने या छायाचित्रांची तज्ज्ञांकडून पडताळणी केल्यानंतर वृत्त दिले आहे. हे फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजीचे आहेत. चीननं हद्द ओलांडून ४.५ किमी भारतीय हद्दीत घुसखोरी करून हे गाव वसवलं असून, या गावात १०१ घरं बांधले असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

सरकारी नकाशानुसार हा भाग भारतीय हद्दीत येतो, मात्र, १९५९ पासून त्यावर चीनने कब्जा मिळवलेला आहे. पूर्वी इथे फक्त चिनी सैन्याची चौकी होती. मात्र, नव्या छायाचित्रात इथे गाव वसवण्यात आल्याचे दिसत आहे. अरुणाचल प्रदेशात असलेल्या अप्पर सुबनशिरी जिल्ह्याच्या हद्दीत हा भूभाग येतो. त्सारी चू नदीच्या काठावर चीननं हे गाव वसवलं असून, या भूप्रदेशावरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.

Leave a comment

0.0/5