Skip to content Skip to footer

पोलिसांच्या हाती दिल्ली स्फोटाचे फुटेज, दोन संशयित सीसीटीव्ही ने टिपले

दिल्लीतील औरंगजेब रोडवर असलेल्या इस्रायलच्या दुतावासाजवळ बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. सव्वा सहाच्या दरम्यान हा बॉम्बब्लास्ट झाल्याचे समोर आले होते. या घटनेत चार ते पाच गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

विशेष म्हणजे दिल्ली स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेजही आता हाती लागले आहेत. पोलिसांना इस्राएलच्या दूतावासाबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्पेशल सेलला सापडले असून, २ व्यक्तींना टॅक्सी सोडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे.

त्या दोघा संशयितांचे स्केच आता सीसीटीव्ही फुटेज आणि ड्रायव्हरच्या साथीने तयार करण्यात येत आहेत. पोलिसांना घटनास्थळी बंद पाकीटही आढळले आहे, तसेच एक चिठ्ठीसुद्धा सापडलीय. त्या चिठ्ठीत इस्रायली भाषेतून इशारा देण्यात आला आहे, ये तो ट्रेलर है, असा चिठ्ठीत उल्लेख होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून तपास सुरू आहे.

Leave a comment

0.0/5