Skip to content Skip to footer

लग्नाच्या दोन महिन्यातच सना खानने संतापून केली सोशल मीडिया पोस्ट, म्हणाली…

तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

अभिनेत्री सना खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. ‘इस्लाम’साठी इंडस्ट्री सोडणाऱ्या सनाने काही दिवसांपूर्वी लग्न केल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. आता सनाच्या लग्नाला जवळपास दोन महिने झाले असून तिने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टद्वारे तिने संताप व्यक्त केला आहे.

सनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने, ‘गेल्या काही दिवसांपासून काही लोकं माझे निगेटीव्ह व्हिडीओ तयार करत आहेत तरी देखील मी शांत बसले. पण आता एका व्यक्तीने माझ्या भूतकाळावर एक व्हिडीओ तयार केला आहे आणि तो या व्हिडीओमध्ये काहीही बोलत आहे. तो व्हिडीओ पाहून मला वाईट वाटले’ असे म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CKj_kLXgbXQ/?utm_source=ig_web_copy_link

 

व्यक्ती माझ्यासोबत तशी वागली म्हणून मी त्याच्यासोबत तसे वागणार नाही. जर कोणाची प्रशंसा करता येत नसेल तर शांत रहा. पण अशा प्रकारे कमेंट करत कोणालाही नैराश्यामध्ये जाऊ देऊ नका. त्या व्यक्तीला त्याच्या भूतकाळामुळे दोषी ठरवू नका’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

सना खानने ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसची ती गर्लफ्रेंड होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर तिने मेल्विनवर अनेक आरोपसुद्धा केले होते. त्यानंतर तिने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर इंस्ट्रीसोडत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर २० नोव्हेंबर रोजी गुजरातचे मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला.

Leave a comment

0.0/5