Skip to content Skip to footer

शेतकरी आंदोलनाचा मुद्या आता गाजणार आंतरराष्ट्रीय पातळीवर

केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याला मोठ्या संख्येने देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. त्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर मागच्या दोन महिन्यांपासून शेतकरी मोदी सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला देशभरातील अनेक बड्या सेलिब्रिटींनी पाठिंबा दर्शवला होता.

त्यात आंदोलनचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटताना दिसत आहेत. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आदी देशांतील राजकीय नेत्यांनंतर आता आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनीही पाठिंबा दर्शवण्यास सुरुवात केली आहे. हॉलिवूड पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आता पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गनेही पाठिंबा दर्शवला आहे. रिहानाच्या ट्विटमुळे आंतरराष्ट्रीय मंचावर शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर मोठी चर्चा सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हॉलिवूड पॉप स्टार रिहानाने दिल्लीजवळील भागात इंटरनेट बंद केल्याची बातमी ट्विट करत आपण यावर काही बोलणार नाही का, असा प्रश्न उपस्थित केला. तिच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर रिहाना आणि शेतकरी आंदोलनावर जोरदार चर्चा झाली.

Leave a comment

0.0/5