Skip to content Skip to footer

TRP घोटाळा : अर्णब गोस्वामी आणि दासगुप्ता यांची होणार समोरा-समोर चौकशी

TPR घोटाळ्यावरून आर. रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या अडचणीत अधिक वाढ होताना दिसून येत आहे. न्यायालयात जे कागदपत्र पुरावे म्हणून सादर करण्यात आले आहेत त्यावरून हा TRP घोटाळ्याचा साधा गुन्हा नसून त्यापेक्षा अधिक बरेच काही आहे त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होणे अत्यावश्यक आहे.

आरोपी पार्थो दासगुप्ता आणि वाहिन्यांचे मालक, अँकर गोस्वामी यांच्यामधील व्हॉट्सअॅप संभाषणांत अनेक सांकेतिक शब्दही वापरण्यात आले आहेत. त्याचा अर्थ केवळ आरोपीच सांगू शकतो. त्यामुळे त्यांची समोरासमोर चौकशी होणे आवश्यक आहे, असे अत्यंत महत्त्वाचे व गंभीर निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने दासगुप्ताचा जामीन अर्ज फेटाळणाऱ्या आदेशात नोंदवले आहे.

TRP घोटाळ्याचा सूत्रधार असल्याच्या आरोपाखाली २४ डिसेंबर २०२०पासून अटकेत असलेला ‘बार्क’चा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्ताचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. ए. भोसले यांनी २० जानेवारीला फेटाळून लावला होता. त्या आदेशाची प्रत मंगळवारी उपलब्ध झाली. तपासादरम्यान हाती लागलेल्या मोठ्या प्रमाणातील व्हॉट्सअॅप संभाषणांतून अनेक बाबी समोर येत असल्याने तपास अधिकाऱ्याला सखोल चौकशी करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायाधीशांनी त्यात नोंदवले आहे.

Leave a comment

0.0/5