Skip to content Skip to footer

‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’; उदयनराजे यांच्या समर्थकांची तोडफोड

फाईट‘ चित्रपटाच्या पोस्टरची आणि दिग्दर्शकाच्या गाडीची तोडफोड राष्ट्रावादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी केली आहे. साताऱ्यातील राधिका पॅलेस हॉटेलच्या परिसरात हा प्रकार घडला आहे.

‘फाईट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी साताऱ्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. इतर कलाकारांसह सिनेमाचे दिग्दर्शक जिमी मोरे यांचीही उपस्थिती होती.

चित्रपटातील ‘साताऱ्यात फक्त मीच चालणार’ या डायलॉगवर उदयनराजेंच्या समर्थकांनी आक्षेप घेतला आहे. ‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’, असं सांगत समर्थकांनी तोडफोड केली आहे.

दरम्यान, चित्रपटातील हा डायलॉग काढावा म्हणून ही तोडफोड करण्यात आली आहे, असंही समर्थकांनी सांगितलं.

Leave a comment

0.0/5