Skip to content Skip to footer

दुधाची प्लास्टिक पिशवी बंद होणार नाही अन दूध दरवाढ होणार नाही!

पंढरपूरप्लास्टिक बंदीमुळे दूध पिशव्यांचा गहन प्रश्न निर्माण झाला होता. वितरकांनी मोठी दर वाढ होण्याची भीती व्यक्त केली होती, मात्र शक्यता आज पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दूध दर वाढ फेटाळून लावली असून दुधाच्या पिशव्यावर बंदी घालणार नाही. मात्र काही अटी आणि नियम घालून त्यावर नियंत्रण मिळविले जाणार आहे. त्यामुळे दरात कोणतीही दरवाढ होणार नाही अशी माहिती त्यांनी दिली.

पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या कदम यांनी वितरक, उत्पादक आणि ग्राहकांना दिलासा दिला. ग्राहकाने दूध पिशवी घेताना वितरकाकडे 50 पैसे डिपॉझिट ठेवायचे, पिशवी जमा केली केली की त्याला पैसे परत मिळतील. परदेशात अशा प्रकारे वितरण केले जाते उद्या या संदर्भात मुंबईमध्ये बैठक बोलविल्याने कदम यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5