Skip to content Skip to footer

शिवसेनेच्या पुढाकाराने एस.टी महामंडळाला सुखाचे दिवस……

आज पर्यंत शिवसेनेने लोकांच्या आणि कामगारांच्या हिताचेच काम केले आहे. त्यात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे दुष्काळग्रस्त भागातील युवकांसाठी एस.टी महामंडळाची मेगा भरती चालक-वाहकाची एकूण ४२४२ पदे भरणार आहे आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे कंत्राटी पद्धतीने एस.टी महामंडळा मार्फत भरण्यात येणार आहे.

आज मराठा आरक्षणासाठी युतीने घेतलेल्या निर्णय नंतर येणाऱ्या एसटी महामंडळात मराठा आरक्षणाची अंबलबजावणी महामंडळ करणार आहे. त्यातच मा.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळ आता मालवाहतूक क्षेत्र आणि गोदाम यातही उतरण्याचे संकेत दिलेले आहे त्याचे सादरीकरण सह्याद्री अतिथीगृहावर करण्यात आले.
इत्तर राज्यात आज पर्यंत कोणतेही महामंडळ मालवाहतूक आणि गोदाम या क्षेत्रात उतरलेले नाही परंतु आज या उपक्रमामुळे महामंडळ फायद्यात येऊ शकते. तसेच एसटी महामंडळ स्वतःचे गोदामे ही इतरत्र स्थापन करणार आहे त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढण्यात जरूर हातभार लागेल असे मत आज मा. रावते साहेब यांनी व्यक्त केले. यामुळे आज महामंडळ तोट्यात आहे अशी ओरड देणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला कुठेतरी आला बसेल असेच वाटते.

आज या मालवाहतूक आणि गोदामाच्या मोठ्या प्रमाणात फायदा शेतकरी व खेडे गावातील शेतकऱ्यांना जरून होणार यात शंका नाही. कारण कृषिमाल,अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि स्टेशनरी यांची ने-आन करण्यासाठी एसटी महामंडळाचा पुरेपूर शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे व कुठेतरी खेडेगावातील जण जीवन सुधारण्यासाठी जरूर मदत होणार आहे. आज पर्यंत शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी जनतेचा विचार केला आहे. आज पर्यंत झालेल्या परिवहन मंत्र्यांनी फक्त महामंडळ तोट्यात चालली आहे म्हणून ओरडले आहेत पण फायद्यात आणण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. पण ते प्रयत्न आज शिवसेनेचे मंत्री मा. दिवाकर रावते यांनी करून दाखविले.

Leave a comment

0.0/5