Skip to content Skip to footer

मतदान भाजपाला करता आणि मदत आमच्याकडे मागता शरद पवार यांचा सवाल

मतदान शिवसेना-भाजपाच्या नेत्यांना करता आणि मदत आमच्याकडे मागता असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनगर समाजाला केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, करमाळा तालुका, माढा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्ता, पदाधिकारी संवाद कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. बोलताना शरद पवार म्हणाले की, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फार हुशार आहेत कोर्टात न टिकणारे आरक्षण त्यांनी मराठा समाजाला देऊन जल्लोष करा असे सांगतात ? मतदान भाजपा-शिवसेनेला करता आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवून द्या असे आम्हाला का असे शरद पवार म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याआधी कोणी ओळखत तरी होते का ? मुख्यमंत्र्यांना शेती मधील काय कळते, साधा भुईमुग नक्की कुठे उगवतो हे तर त्यांना माहीत आहे का ? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांच्यातील वाद येणाऱ्या निवडणुकीला पेटणार असेच चिन्ह दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्या आघाडी विरुद्ध बोलताना राष्ट्रवादीने खासदारकीला दोनचा आकडा कधी गाठला नाही आणि पवार यांना पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पडत आहे आणि झालेच तर ते रविवारचे पंतप्रधान बनतील कारण रविवारी सुट्टी असते असे बोलून शरद पवार यांची खिल्लीच उडवली होती.
आज मतांसाठी धनगर समाजाला उद्देशून बोलल्यामुळे सर्व स्थरातून शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. शरद पवार यांच्या या बोलण्यामुळे कुठेतरी धनगर समाज दुखावलेला आहे. आज पुन्हा मतांचे राजकारणच करताना शरद पवार दिसून येत आहे. सोलापूर येथे झालेल्या सभेला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनदादा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासह अन्य अशी मातब्बर नेत्यांनी दांडी मारल्याने राष्ट्रवादीमधील गटबाजी उघड झाली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला याचा फटका पक्षाला जोरदार बसणार आहे.

Leave a comment

0.0/5