मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर नाणार प्रकल्पाला स्थगिती देऊन तेथील शेतकऱ्यांच्या हस्तांतरीत केलेल्या जमिनी पुन्हा परत करण्याचे आदेश दिलेले आहे. तसा अध्यादेश लवकरच शासना कडून काढण्यात येणार आहे. शिवसेना ” जे बोलते ते करून दाखवते” याची प्रचिती पुन्हा एकदा कोकण वासियांना आलेली आहे. काही महिन्यापूर्वी प्रकल्पग्रस्थ शेतकरी आणि स्थानिक यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतलेली होती. उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रकल्प ग्रस्थांना वचन दिले होते की, कोकणवासीयांच्या जीवावर उठलेला हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही आणि भाजपा बरोबर युतीच्या निर्णया पूर्वी हा प्रकल्प रद्द करूनच शिवसेना पक्षाने युती बद्दल हिरवा कंदील दाखवला होता. परंतु श्रेय कोणाचे आणि घेतय कोण असाच अजब प्रकार सध्या कोकणात सुरु झाला आहे.
सर्व कोकणवासीयांना हा प्रकल्प शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नानेच रद्द झालेला आहे तसे माहित असताना सुद्धा नारायण राणे यांनी आपल्याच दूरदृष्टीने हा प्रकल्प रद्द झाल्याच्या खोट्या अफवा सोशल मीडियावर पसरवून कुठेतरी श्रेय लाटण्याचा प्रयत्न राणे आणि त्यांची दोन मुले करताना दिसत आहे. “महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला यश नाणार प्रकल्प रद्द” या विषयांचे संपूर्ण कोकणात बॅनर लावून नाणार प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रकार राणे यांनी चालू केला आहे. परंतु भाजपाच्या कोट्यातून खासदार झालेले नारायण राणे भाजपा पक्षाला कसा काय विरोध करू शकतात हाच प्रश्न आज कोकण वासियांना पडलेला आहे.
कोकणाची जनता ही कालपण आणि आजपण शिवसेना पक्षाच्या मागे खंबीरपणे उभी आहे. आज कोकण हा शिवसेना पक्षाचा गड मानला जातो. आज नाणार प्रकल्प रद्द करून कोकणातील जनतेचे आणि शिवसेनेचे नाते अजूनच घट्ट झालेले दिसून येत आहे. परंतु फक्त राजकारणाच्या पलीकडे राणे यांनी कधीच कोकणाच्या नागरिकांचा विकास केला नाही आहे म्हणूनच मागच्या २०१४ च्या निवडणुकीला राणे यांच्या मुलाचा खासदारकीला दारुण पराभव झालेला होता आणि आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी शिवसेना पक्षाने केलेल्या कार्याचे श्रेय लाटण्याचा अजब प्रकार राणे आणि त्यांचे पुत्र करताना दिसत आहे.