Skip to content Skip to footer

डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिनेता ते राजकीय व्यक्ती म्हणून उलट प्रवास

छत्रपती संभाजी महाराज फेम या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना पक्षाला राम-राम ठोकून राष्ट्रवादी नेत्याच्या हुजरीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर शिवसेना पक्षाने जिल्हा प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. परंतु महाराष्ट्राच्या जनतेने अभिनेता म्हणून जितके भ-भरून प्रेम कोल्हे यांना दिलेले आहे. आज ते सक्रिय राजकारणी म्हणून ते प्रेम महाराष्ट्राच्या जनतेचे राहिलेले नाही आहे. आज खासदारकीला ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून उभे राहणार असल्याच्या चर्चा सुद्धा समोर येत आहे. आज डॉ. कोल्हे यांनी राजकारणात न पडता आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनय क्षेत्रात प्रगती केली पाहिजे होती हीच आज त्यांच्या चाहत्यांची ईच्छा होती.
पिपरी-चिंचवड येथे त्यांच्या आगमनाचे बॅनर लावताना राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचे बॅनरवर छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषा मधील फोटो बॅनरवर टाकून कुठेतरी शिवशंभू प्रेमींना दुखावलेले आहे. आज छत्रपती शंभाजी महाराज यांच्या प्रतिमेचा आपल्या वैयक्तिक राजकारणासाठी वापर केल्यामुळे आज डॉ. कोल्हे यांनी महाराष्ट्रातील जनतेचा रोष अंगावर ओढावून घेतलेला आहे त्यात काहींनी कोल्हे यांना फोन करून झापले सुद्धा आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी राजकारणात सक्रिय होऊन आपल्याच पायावर दगड मारून घेतल्याच्या चर्चा सुद्धा रंगत आहे.
आज डॉ. अमोल कोल्हे यांनी राजकारणात प्रवेश करून आपली प्रतिमा महाराष्ट्रातील जनतेच्या नजरेत मालिन करून घेतलेली आहे. आज छत्रपती संभाजी महाराज मालीका या आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते त्या छबीला कुठेतरी स्वतः डॉ. कोल्हे यांनी इजा पोहचवलेली आहे. आज प्रत्येकच्या मनातून ते उतरलेले आहे. आज राष्ट्रवादी साहजिकच त्यांना स्टार प्रचारक म्हणून महराष्ट्रात वापर करून मते मागण्याचा हमखास प्रयत्न करणार परंतु ज्या व्यक्तीने आपल्या अभिनया बरोबर गद्दारी केली त्या व्यक्तीला महराष्ट्रातील जनता कदापी स्वीकारणार नाही.

Leave a comment

0.0/5