Skip to content Skip to footer

खा. अरविंद सावंत पुन्हा दक्षिण मुंबई मतदार संघात भगवा फडकवणारच

मुंबईतील उच्चभ्रू मतदारसंघांपैकी एक मतदार संघ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून नावारुपाला आलेला मुंबईचा दक्षिण मुंबई हा मतदार संघ गणला जातो. विद्यमान खासदार अरविंद खासदार यांच्या गळ्यात २०१४ खासदारकीची माळ पडली. यावेळेस शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये युती झाल्याने महाआघाडीच्या उमेदवाराचा मार्ग तसा कठीण नाही. त्यातच राहुल गांधीचे निकटवर्तीय आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी निवडणूक लढविण्यास तत्काळ नाकार दिल्याने या मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांन मध्ये म्हणावा तितका उत्साह सध्या राहिलेला दिसून आलेला नाही आहे.

या मतदार संघात शिवसेना पक्षाचे ६ आमदार आहेत. शिवसेना आणि भाजपा पक्षाच्या नगरसेवकाची संख्या जास्त आहे. त्यामुळे युतीच्या नेत्याचे प्रबळ वर्चस्व आहे. कुलाबा आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर सेनेचे देखील वरळी आणि शिवडी मतदारसंघात दोन आमदार आहे. यंदा याठिकाणी मनसे उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याने शिवसेना मतविभागणीचा फटका बसणार नसल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी याठिकाणी शिवसेनेचे अरविंद सावंत हेच पुन्हा खासदार होणार अशीच चर्चा सध्या मुंबईत होत आहे. तसेच फेम इंडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा श्रेष्ठ सासंद पुरस्कार खासदार अरविंद सावंत यांना प्रदान करण्यात आला होता.

Leave a comment

0.0/5