Skip to content Skip to footer

राज ठाकरेंना आघाडीत या असं कधीच म्हटलं नाही ,पवारांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे : मी राज ठाकरे यांना भेटलो मात्र आघाडीत या असं कधीही म्हटलं नसल्याचा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत पवारांनी हे गुपित सांगितलं.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले की, ‘राज ठाकरेंना मी भेटलो मात्र त्यांना आघाडीत या’ असा आग्रह केलेला नाही. यावेळी राज ठाकरेंचे भाषण बारामतीवरून पढवलेले होते असा आरोप केलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनी उत्तर दिले आहे. पढवणं ही बारामतीची परंपरा आहे अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. बारामतीची ही परंपरा पेशवे काळापासून असून मोरोपंत बारामतीचे होते अशी आठवणही त्यांनी करून दिली.

दरम्यान,आगामी लोकसभा निवडणुकीतून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी माघार घेतली असून नवीन दमाच्या उमेदवारांना संधी देण्यासाठी मी माघार घेत आहे असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. कुटुंबातील सर्वच उमेदवार नकोत असा कुटुंबात विचार झाला. त्यामुळे नवीन दमाच्या उमेदवाराला संधी देवून मी थांबणार आहे असं पवारांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5