Skip to content Skip to footer

उत्तर-पश्चिम मुंबईच्या जागेसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच !

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रविवारी लोकसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण देशभरातील राजकीय पक्षांच्या हालचालींना गती प्राप्त झाली आहे. त्या अनुशांघानेच कॉंग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजप ला धुळीत मिळवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे तर उत्तर पश्चिम मुंबई मधून भाजप-शिवसेना युतीला शह देण्यासाठी कॉंग्रेसच्या तीन उमेदवारांनी तयारी दाखवली आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये सध्या एका जागेवरुन जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

उत्तर पश्चिम मुंबई मधून काँग्रेसच्या तीन जेष्ठ नेत्यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चर्तुवेदी आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.सध्यातरी या रस्सीखेचमध्ये संजय निरुपम यांचे पारडे जड आहे.काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या निधनानंतर संजय निरूपम यांनी या मतदारसंघासाठी चांगलेच योगदान दिले आहे. त्यामुळे संजय निरुपम यांच्याकडे उमेदवारी जाण्याची शक्यता आहे.

सध्या उत्तर पश्चिम मुंबई मध्ये शिवसेना-भाजप युतीचे गजानन किर्तीकर हे खासदार आहेत. इतिहास पाहता उत्तर पश्चिम मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा पण २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने इथे बाजी मारली. त्यामुळे हा मतदार संघ कॉंग्रेसला पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेयचा आहे. त्यासाठी काँग्रेस नेत्यांची या मतदार संघासाठी चंगलीच धडपड पाहायला मिळत आहे.

Leave a comment

0.0/5