Skip to content Skip to footer

Lokasabha 2019: पार्थच्या उमेदवारीवर शरद पवार यांच्याकडून शिक्कामोर्तब

पुणे- अनेक दिवस मावळ लोकसेभेमधून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याविषयी चर्चा रंगत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केले आहे. अनेक दिवसांपासून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा चालू होती, यावर पार्थ पवार हे निवडणुक लढणार नसल्याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले होते. पंरतु आज पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे झालेल्या बैठकीनंतर पार्थने निवडणुक लढवावी ही सर्वांचीच इच्छा असल्याचे म्हणत पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

शेतकरी कामगार पक्षासह सर्वच पक्षांनी पार्थ पवार यांनीच मावळमधून निवडणुक लढवावी असा आग्रह धरल्यामुळेही पार्थला निवडणुक लढवण्याची संधी दिली असल्याचे पवार यांनी सांगितले. एकूण मावळ लोकसभा जागेवरील उमेदवारीबाबत आता सर्व चर्चा थांबल्या असून पार्थ पवार यांचे नाव जाहीर झाले आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून एकाच कुंटुबातल्या किती व्यक्तींनी निवडणुक लढावी हा प्रश्न आहे, त्यामुळे आपण माढ्यामधून लढणार नसल्याचे संकेतही शरद पवार यांनी यावेळी दिले आहेत. त्याचबरोबर पडण्याच्या भीतीमुळे पवारांनी माघार घेतली या चर्रेवर देखिल त्यांनी पडदा टाकताना म्हटले की, आतापर्यंत कुठल्याच निवडणुकीला घाबरलो नाही आणि निवडणुकीत पराभवही झाला नाही, त्यामुळे घाबरण्याचा प्रश्नच नाही असेही ते यावेळी म्हणाले.

Leave a comment

0.0/5