Skip to content Skip to footer

माझी मातोश्रीवर तक्रार जाऊ देऊ नका – चंद्रकांतदादा पाटील

उगमही लोकसभा निवडणुकीला कोल्हापुरात राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक आणि शिवसेना पक्षातून प्रा. संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री असलेले चंद्रकांतदादा पाटील यांचे आणि राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे हे अख्या कोल्हापूरच्या जनतेला माहीतच आहे. शिवसेना-भाजपची युती व्हावी, यासाठी मी रक्‍ताचे पाणी केले आहे. आता तुम्ही युतीधर्म पाळा. प्रामाणिकपणे युतीच्या उमेदवाराचा प्रचार करा. माझी ‘मातोश्री’वर तक्रार जाता कामा नये, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महापालिकेतील भाजप नगरसेवकांना दिल्या आहे.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यांची भूमिका ऐकून घेतली. यानंतर काही प्रमुख पदाधिकार्‍यांशी त्यांनी स्वतंत्रपणे चर्चाही केली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आजपासून कामाला लागा, असे सांगत जी दिशा होती, ती आता स्पष्ट आहे. त्यानुसार युतीचा उमेदवार विजयी होईल, त्याच दृष्टीने प्रचाराला लागा, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना-भाजपा उमेदवार प्रा. संजय मंडलिक भारी बहुमताने जिंकूनच येणार असेच चित्र सध्या कोल्हापुरात दिसून येत आहे.

भाजपा-शिवसेना युतीच्या निर्णयांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी प्रमुख भूमिका निभावलेली आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची मातोश्री येथे झालेल्या भेटीदरम्यान चंद्र्कांतदादा पाटील हे सुद्धा बरोबर होते. आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी एकेक उमेदवार आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले होते. नंतर पुन्हा सात मते त्यांना कमी पडली होती. यामुळे युतीचा उमेदवार निवडून आणावा लागणार आहे. त्यादृष्टीने एकजुटीने, एकदिलाने तुम्हाला काम करावे लागणार आहे. असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांन समोर पाटील यांनी मांडलेले आहे.

Leave a comment

0.0/5