Skip to content Skip to footer

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठा दणका

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मंडळी पक्षांतर करत असून अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. दोन मंत्री आणि सहा आमदारांनी भाजपला राम राम ठोकत नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षात प्रवेश केला आहे. तसेच या आठ आमदारांसह १२ पदाधिकाऱ्यांनी देखील नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.उमेदवारी न दिल्याने नराज होऊन अखेर या आमदारांनी भाजप बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये राज्य सचिव जरपूरम गॅमलिन, राज्याचे गृहमंत्री कुमार वै, पर्यटन मंत्री जरकार गॅमलिन आणि इतर आमदारांनी उमेदवारी न दिल्याबद्दलची नाराजी व्यक्त करत एनपीपी मध्ये प्रवेश केला. भाजपच्या संसदीय समितीने रविवारी ६० सदस्यसंख्या असणाऱ्या विधानसभेसाठी ५४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती.

दरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकी बरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एवढ्या मोठयाप्रमाणात गळती होणे ही भाजपसाठी धोक्याची घंटा असणार आहे.

Leave a comment

0.0/5