टीम महाराष्ट्र देशा: पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळून गेलेल्या नीरव मोदीला आज लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. नीरव मोदी हा हिऱ्यांचा व्यापारी आहे. त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून १३ हजार कोटींचे कर्ज घेतले होते. त्यानंतर तो परदेशात फरार झाला होता. पीएनबी घोटाळ्याची चौकशी सीबीआय आणि ईडी करत आहे.
नीरव मोदी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यावर कारवाई करून त्याला त्वरित अटक करावी अशी मागणी सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटनच्या सरकारकडे केली होती. निरव मोदीला अटक करून भारताच्या ताब्यात द्यावे अशी विनंती करण्यात आली होती. या संदर्भात प्रकारची कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ब्रिटन सरकारने दिले आहेत. नीरव मोदीला अटक केल्याने भारत सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे