Skip to content Skip to footer

चंद्रपूर, रामटेक लोकसभा शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर आणि रामटेक लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या प्रभारी नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

चंद्रपूर लोकसभा
प्रभारी जिल्हा संपर्कप्रमुख – सुरेश सावंत (चंद्रपूर जिल्हा), प्रभारी जिल्हाप्रमुख – संदीप गिऱहे (विधानसभा- चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा), नितीन मते (विधानसभा – चिमूर, ब्रम्हपुरी, वरोरा), प्रभारी विधानसभा क्षेत्र प्रमुख- सुनील कातकडे (विधानसभा-वणी), प्रभारी तालुका संघटक – गजानन किन्हेकर (तालुका-मारेगाव), बाळू चिडे (तालुका -झरी), प्रभारी शहर संघटक- सुधीर थेरे (शहर-वणी)

रामटेक लोकसभा
प्रभारी सहसंपर्कप्रमुख – दिवाकर पाटणे (विधानसभा – हिंगणा), प्रभारी विधानसभा समन्वयक – रतिराम रघुवंशी (विधानसभा-रामटेक)

Leave a comment

0.0/5