Skip to content Skip to footer

ना आघाडी, ना युती म्हणणारे राजू शेट्टी महाआघाडीत सामील

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून सुरुच होत. चार जागांवर आघाडीची चर्चा सुरु आहे. तर त्यातच आघाडीत येण्यासाठी इच्छुक असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीत न जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलेली होती . स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी हे त्यांच्या स्वतःसह नऊ जागांवर उमेदवार देणार असल्याचे निश्चित केले होते. परंतु राजू शेट्टी यांनी आपल्याच शब्दाचा मान न ठेवता शेवटी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीत सामील झालेले आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या मतदार संघात विरोधकांचे पारडे जड झालेले दिसून येत आहे.

राजू शेट्टी यांनी आपल्या पक्षाची स्थापन ही, शेतकऱयांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेली होती आणि त्याच्या विरोधात त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सत्ताधारी पक्षांचे विरोधक होते आणि २०१४ च्या निवडणुकीला जनतेने सुद्धा राजू शेट्टी यांना कौल देऊन आपला खासदार म्हणून निवडून सुद्धा आणले होते. परंतु आज आपल्या पक्षाला मिळणाऱ्या जागे संबंधी भांडताना राजू शेट्टी खरंच शेतकऱयांचे कैवारी आहे का? की नुसतच नावाला शेतकरी नेते म्हणून मिरवतात हाच प्रश्न सध्या जनतेला पडलेला आहे. परंतु आज राजू शेट्टी यांनी भाजपा पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीत सामील झालेले आहे.

आज इतकी वर्ष काँग्रेस आणि राष्ट्र्वादीने सत्ता भोगून सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाही आहे आणि शेट्टी यांनी लढा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या हातात असलेल्या साखर कारखाने आणि इतर संस्थांना विरुद्धच दिलेला होता आणि आज शेट्टी यांनी त्याच काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती करून शेतकर्यांचा विश्वासघात केला आहे हीच ओरड सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांची आहे. त्यामुळे शेतकरी नेता म्हणून घेण्याची आज राजू शेट्टी यांना अधिकार राहिलेली नाही आहे.

Leave a comment

0.0/5