Skip to content Skip to footer

पार्थ पवार यांचा पंतप्रधान यांच्या नावाचा एकरी उल्लेख

मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. ‘तो’ एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो तर पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का नाही मांडू शकत, असे पार्थ पवार म्हणाले होते. तसेच आजोबा शरद पवार यांना आपल्याला पंतप्रधान करायचंय, कामाला लागा असे आवाहनही यावेळी केले होते.

पार्थ अजित पवार पहिल्या भाषणामुळे चांगलेच सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करत वडगाव मावळ येथे माध्यमांशी बोलताना आपण काम जास्त आणि कमी बोलतो असा विरोधकांना टोला लगावला होता. त्यानंतर त्यांच्यात भाषण शैली आणि वक्तृत्व असल्याच बोलले जात होत. परंतु पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा एकेरी उल्लेख केल्याचं पाहायला मिळाले.

पार्थ पवार यांना धड बोलता पण येत नाही आणि मोठ्यांचा आदर सुद्धा करता येत नाही. आज देशाचे पंतप्रधान यांना एकेरी नावाने हाक मारून पार्थ हे खरे शरद पवार यांचे नातू शोभतात. आज पार्थ यांनी देशाच्या सर्वोच पदावर बसलेल्या व्यक्तीचा नाही तर त्या खुर्चीचा आदर केला हवा होता. पिंपरी-चिंचवडचा विकास महाराष्ट्रभर मांडला नाही अस माझा मित्र म्हणत आहे. ‘तो एक मोदी’ गुजरात भारतभर मांडू शकतो तर पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का मांडू शकत नाही तेच मला कळत नाही असे ओघाच्या भरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करून टीका केली होती.

Leave a comment

0.0/5