Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे शरद पवार सर्वात भ्रष्ट नेते! विकिपीडियाच्या माहितीने खळबळ

लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पण, प्रचारसभांखेरीज डिजीटल माध्यमातही ही रणधुमाळी पाहायला मिळत आहे. याचा प्रत्यय नुकताच विकिपीडिया या माहितीस्थळावरून आला आहे. कारण, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सगळ्या भ्रष्ट नेता असल्याचे त्यांच्या विकिपीडियावर लिहिले आहे. त्यामुळे आता शरद पवार हे भारता बरोबर विदेशातही भ्रष्ट नेते म्हणून समजून येणार आहेत. ही माहिती सोशल मीडिया वरील विकिपीडियाच्या माहितीच्या आधारे समोर आलेली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, एका फेक अकाउंटच्या साहाय्याने विकिपीडीयावर पवार यांच्या माहितीत फेरफार केली गेली. आधी त्यांच्या प्रोफाईलवर ते देशातले सर्वात भ्रष्ट नेता असल्याचे लिहिले गेले होते. त्यानंतर काहीवेळाने त्यात बदल करून ते सर्वात इमानदार नेता असल्याचे लिहिले गेले होते. विकिपी़डियावरील माहितीचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर काही वेळाने त्यांची माहिती योग्यरीतीने संपादित करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेता रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रोफाईलवरही अशाच प्रकारे चुकीची माहिती दिसत होती. त्यांना एकाचवेळी तीन वेगवेगळ्या पक्षांचे नेते म्हणून दाखवण्यात आले होते.

Leave a comment

0.0/5