Skip to content Skip to footer

काँग्रेस संजय निरुपम यांच्या कार्यकर्त्यांची पत्रकारांना धक्काबुक्की

मुंबई काँग्रेस प्रदेशचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदावरून हकालपट्टी करून त्या जागी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना मुंबई अध्यक्ष पद देण्यात आलेले आहे. त्यामुळे एन निवडणुकीच्या तोंडावर प्रतिष्ठेचे मानले जाणारे पद हातातून गेल्यामुळे निरुपम यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारत असलेल्या पत्रकारांवर आपला राग व्यक्त केला. निरुपम यांना अडचणीचा प्रश्न विचारल्याच्या मुद्दय़ावरून निरुपम यांचे समर्थक पत्रकारांच्या अंगावर धावून गेले आणि टीव्ही चॅनेलच्या पत्रकारांना धक्काबुक्की सुद्धा केली. त्यामुळे निरूपम यांचे पद काढून घेतल्यामुळे सध्या ते कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर संजय निरुपम यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. निरुपम यांना काँग्रेसने उत्तर-पश्चिम मुंबईतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. निरुपम यांनी त्यांच्या उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. तुम्ही उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक का लढवण्यास तयार झाला नाहीत असा प्रश्न पत्रकार मंडळींनी संजय निरुपम यांना विचारला त्यामुळे गोंधळलेल्या निरुपम यांनी पत्रकारांशी उद्धटपणे बोलणे चालू केले होते. या सर्व प्रकारात निरुपम यांचे समर्थक पत्रकारांच्या अंगावर धावून गेले.

आज निरुपम यांना अध्यक्ष पदावरून काढून त्या जागी राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडचे माजी मंत्री मिलिंद देवरा यांची वर्णी लागलेली आहे. आज देवरा आणि निरूपण यांच्यातील वाद हे राहुल गांधी यांच्या पर्यंत पोहचलेले आहे. तसेच राहुल गांधी यांनी हे वाद लवकरात लवकर मिटवण्याचा सल्ला सुद्धा दोघांना दिलेला होता. या पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम यांच्या मनातील खदखद बाहेर पडली. मला हटवल्यानंतर आता तरी मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपेल. आता तरी हायकमांडकडे तक्रारी कमी होतील, असा टोला त्यांनी त्यांच्या विरोधकांना मारला.

Leave a comment

0.0/5