आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षाने आपले स्टार प्रचारक जाहीर केलेले आहे त्यातच शिवसेना पक्षाने सुद्धा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आपल्या पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सह स्टार प्रचारकांनी यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला शिवसेना पक्षाचे सर्वच्या सर्व खासदार हे अधिक मताने निवडणून येणार आहे असा विश्वास पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे. या प्रचारात एका नावाने लक्ष वेधून घेतलेले आहे ते म्हणजे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तथा युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे.
या यादीत प्रथम स्थानी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दुसऱ्या स्थानी आहे. पुढे या यादीत शिवसेना सचिव सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, मंत्री दिवाकर रावते, मंत्री रामदास कदम, खासदार आनंद गीते, खासदार आनंदराव अडसूळ, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, सिद्धीविनायक न्यास मंदिर अध्यक्ष आदेश बांदेकर, आमदार गुलाबराव पाटील, मंत्री विजय शिवतारे, सूर्यकांत महाडिक, विनोद घोसाळकर, आमदार नीलम गोरे, लक्षमन वडले, नितीन बांडगुळे पाटील, वरून सरदेसाई आणि राहुल लोंढे यांचा नावाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या लोकसभेला शिवसेना पक्षाची ही तोफ महाराष्ट्र गाजवणार हे येणाऱ्या दिवसात दिसून येईल.