Skip to content Skip to footer

गिरीश बापट आमचे गुरु, नरेंद्र मोदी आमचे महागुरू- कांचन कुल

गिरीश महाजन आमचे गुरु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे महागुरू मग त्यांच्या शाळेतील विद्यार्थिनी कच्ची कशी राहील? असे मत बारामती मतदार संघातील भाजपा उमेदवार कांचन कुल यांनी आपले मत मांडले होते. कांचन कुल यांना पवाराच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बारामती मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपाने उतरविले आहे. त्यामुळे बारामती मतदार संघातील लढत अधिकच चुरशीची होणार आहे असेच बोलले जात आहे. आपल्या तीन मिनिटाच्या भाषणात कांचन कूल यांनी दोन मिनिटाचे भाषण वाचून दाखवले होते.

पुढे कांचन कुल म्हणाल्या “तुम्हाला वाटेल हा उमेदवार नवीन आहे. त्यांना कामाची काही माहित नाही पण लक्षात ठेवा, आमचे गुरु गिरीश बापट साहेब आहेत आणि महागुरु नरेंद्र मोदी साहेब आहेत. याच मोदींच्या शाळेत मी शिकले आहे. मग विध्यार्थी कच्चा राहील कसा ? असे उद्गार शेवटच्या मिनिटाला न वाचता म्हणून दाखविले त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे आणि कांचन कुळ यांच्यात सामना अधीकच रंगणार आहे असेच बोलले जात आहे. भाजपाच्या विजय संकल मेळाव्यात आमदार नीलम गोरे यांनी सुप्रिया सुळेवर जोरदार टीका केली. तसेच राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुप्रिया सुळे नुसत्या सेल्फी काढतात “कांचन ताई दिल्लीमे और सेल्फीवाली बाई गल्लीमे” अशी मिश्किल टीका सुद्धा सुप्रिया सुळे यांच्यावर शिवतारे यांनी केली होती.

Leave a comment

0.0/5