ज्येष्ठ दलित नेते नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि दलित पँथरच्या अध्यक्षा मल्लिका अमरशेख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. मल्लिका अमरशेख यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भीमशक्ती आणि शिवशक्ती यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. ते यापुढेही तसेच कायम राहावेत यासाठी आपण हा निर्णय घेतला असून आपण शिवसेनेसाठी प्रचारही करणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या.
येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आता आरपीआय यांच्या बरोबर दलित पँथरची साथ सुद्धा शिवसेना पक्षाला भेटलेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीला शिवसेना पक्षाचा महाराष्ट्रात जोमाने प्रचार सुद्धा होणार आणि शिवसेनेच्या सर्व जागा जिंकून सुद्धा येणार असे मत शिवसेना पक्षाने मांडलेले आहे.