Skip to content Skip to footer

लोकशाहीतील घराणेशाही-शरद पवार आणि त्याचा परिवार

राजा हा राजाच्या पोटी नव्हे तर मतपेटीतून जन्माला यावा असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले आहे. परंतु आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीने लोकशाहीला सुरुंग लावल्याचं दिसत आहे. देशातील सर्वच पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध आहे सांगतात परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट असल्याचं दिसून येत आहे. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे परंतु राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी घराणेशाहीचा सर्रास वापर करताना दिसून येत आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्याच घरात टिकून रहावी म्हणून राजकीय मंडळी प्रयत्नशील असतात. आज आपण महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावी व जेष्ठ नेते आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य राजकारणातील विविध पदांवर कार्यरत आहेत. आज शरद पवार यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पद सुद्धा भूषविलेले आहे. युपीए सरकारच्या कार्यकाळात केंद्रीय कृष्ण मंत्री म्हणून त्यांनी पदभार संभाळला होता. त्याची मुलगी सुप्रिया सुळे ह्या बारामती मतदार संघातून खासदार आहेत. तसेच त्यांचे पुतणे अजित पवार हे महाराष्ट्रातचे माजी मंत्री होते. एका नातू पार्थ पवार सध्या मावळ मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे तर दुसरा नातू रोहित पवार हा जिल्हापरिषद सदस्य आहे.

आज संपूर्ण पवार परिवार हा राजकिया क्षेत्रात सक्रिय आहे. राज्याच्या व देशाच्या राजकारणावर शरद पवार व त्यांच्या कुटुंबाचं वेगवेगळ्या पदांवर वर्चस्व असल्याच दिसून येत आहे. सर्व नेते आपल्याबाजूने जनतेचा विकास करण्यासाठी काम करत असतात. मात्र, हा विकास होत असताना सामान्य कार्यकर्त्यांनाही न्याय मिळणे गरजेच आहे, त्यामुळे ‘राजा हा राजाच्या पोटी नव्हे, तर मतपेटीतून जन्माला यावा’ असे सांगणारे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गरज आजच्या आधुनिक भारताला आहे.

Leave a comment

0.0/5