Skip to content Skip to footer

पणजोबा-आजोबांपासून नाराही हटला नाही आणि गरिबीही- देवेंद्र फडणवीस

पणजोबा, आजोबा पासून काँग्रेसने गरिबी हटावचा फक्त नारा देण्याचे काम केले आहे. त्यांचा नाराही हटला नाही, गरिबी तर हटने दूरच राहिले गरिबी हटावच्या नावाखाली काँग्रेसच्या नेतेमंडळीसह त्यांच्या चेल्याचपाट्यांची मात्र गरिबी दूर झाली, अशी घाणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथरीत झालेल्या सभेला काँग्रेस पक्षावर केलेली आहे. युतीचे उमेदवार खा.संजय जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदी सरकारने केलेल्या विविध योजनांचा पाढा वाचताना काँग्रेसवर कडाडून टीका केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या ६० वर्षात काँग्रेसने गरिबांची थट्टाच करण्याचे काम केले असून आता पुन्हा गरिबी हटावचा नारा देत निवडणुकीत लोकांना ७२ हजार प्रतिमाणसी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांच्या काळात गरिबांना जनधन योजनेच्या माध्यमातून बँकिंग प्रवाहात आणत त्यांची खाती उघडली. ३४ कोटी गरीब जनतेला खाती मिळून त्यांच्या खात्यावर विविध योजनांचे पैसे जमा करताना मध्यस्थ व दलालांना संपवण्याचे काम केले आहे. शेतकरी, कष्टकरी व गोरगरिबांना या माध्यमातून आधार देण्याचे काम सरकारने केले आहे, असेही नमूद केले.

तसेच राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या ७२ हजाराच्या आश्वासनावर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडाडून टिका केली होती. खा.जाधव यांनी आपल्या भाषणात पाथरीत चालणाऱ्या दादागिरीवर भाष्य केले होते. त्याचा धागा धरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉनगिरी चालू देणार नाही. आम्ही देखील दबंग पेक्षा कमी नाही. रावणगिरी चालू दिली नाही, डॉनगिरीला तर केव्हाच संपवू असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा दिलेला होता.

Leave a comment

0.0/5