Skip to content Skip to footer

जनतेचा पैसा खाऊन त्यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसले भुजबळ उत्तर द्या

खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविणे हा देशद्रोह आहे. शेतकरी कर्जजमाफी हा महाघोटाळाच आहे. हे सरकार निर्लज्ज आहे. पहारेकरी चोर आहे. राममंदिर कधी होणार, असे आरोप करणारे शिवसेनेचे उध्दव ठाकरे भाजपा सोबतच जाऊन बसले. त्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम ठाकरे यांनी केले आहे, असा घणाघाती आरोप आमदार छगन भुजबळ यांनी जयसिंगपूर येथील आयोजित सभेत केला. शेतकऱ्यानं बरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. लोकांसाठी काम करणे त्यांची पध्दत आहे असे सुद्धा शेट्टी यांचे कौतुक केले होते.

परंतु महाराष्ट्रातील जनतेला भुजबळ हे नाव मंत्री म्हणून लक्षात नाहीत तर महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी म्हणून चांगलेच लक्षात आहे. ज्यांचे हात घोटाळ्यात काळे झालेले आहेत त्यांनी इतरांवर आरोप करताना १००० वेळा विचार करावा. आज आपल्या घोटाळेबाज टोळीत शेट्टी सामील होऊन ते सुद्धा आपल्या घोटाळेबाज टोळीचे अधिकृत सदस्य झाले आहेत हे आता शेतकऱ्यांना सुद्धा समजले आहे. आज भाजी विक्रेता ते आमदार म्हणून आपला प्रवास चालू झाला होता. परंतु आपली मुंबईत, पुणे आणि नाशिक मधील बेनामी मालमत्ता पहिली असता आपण या महाराष्ट्रातील जनतेला लुटून त्यांच्या पटीत खंजीर खुपसला आहे हे सिद्ध होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नाव ठेवण्याचा आपल्याला नैतिक अधिकार राहातो का हे महाराष्ट्रातील जनतेला विचारले तर बरे होईल.

आज उद्धव ठाकरे यांनी युतीच्या निर्णया आधी शेकऱ्यांना दिलेले कर्ज माफीचे आश्वासन पूर्ण करून घेतले. एकीकडे आपले नेते मंडळी प्रचारात व्यस्थ असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मराठवाडा भागातील दुष्काळग्रस्थ शेतकऱयांचे दुःख दूर करण्यात व्यस्थ होते तर आपण ज्यांच्या प्रचाराला गेला जो स्वतःला खोटा शेतकरी नेता म्हणून राज्यात फिरत असतो त्या राजू शेट्टीने दुष्काळग्रस्थ शेतकर्त्यांसाठी काय केले याचा आधी खोट्या शेतकरी नेत्याने खुलासा करावा. जेल मध्ये असताना छातीत दुखायचे नाटक करणारे आपण आज बाहेर आल्यावर छातीत दुखायचे बंद कसे काय झाले हे आधी सांगावे. आजची जनता हे सर्व जाणते आणि तेच आपल्या सारख्या घोटाळेबाज नेत्याला आणि खोट्या शेतकरी नेत्याला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.

Leave a comment

0.0/5