Skip to content Skip to footer

सोलापुरात राज ठाकरे यांची जाहीर सभा

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसला तरी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका मांडणार हे मनसेने जाहीर केले होते त्यातच राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा नांदेड शहरात पार पडली. या सभेला भाजपा विरोधात आपली भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ठ केली होती. परंतु खरा वाद तर सभा संपल्या नंतर चालू झाला होता. या सभेचा खर्च कोणाच्या नावावर टाकायचा यावरच निवडणूक आयोगा मध्ये एकमत होत नव्हते. नांदेड मध्ये भाजपाला विरोध करून याचा फायदा सरळ काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांना होणार होता असेच बोलले जात आहे. परंतु आज पुन्हा राज ठाकरे यांची तोफ सोलापूर जिल्यात धडाडणार आहे.

सोलापूर जिल्यात काँग्रेस पक्षाकडून माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे भाजपा उमेदवार डॉ. सिधेश्वर यांच्या विरोधात मनसे भूमिका मांडणार हे आता स्पष्ट झालेले आहे. परंतू सोलापूर जागेवर वंचित बहुजन आघडीचे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे आणि बहुजन समाज त्यासारख्या पाठीशी उभा आहे. आज राज ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेला शिंदे यांना पाठिंबा दिला तर ते प्रकाश आंबेडकर यांना विरोध करणार का असाच सवाल सध्या उपस्थित राहिला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे येणाऱ्या विधासभेला दलित मते मसनेच्या पारड्यात पडणार का? हा प्रश्न सुद्धा उपस्थित राहिलेला आहे.

मनसेच्या सभेचा फायदा हा सुशीलकुमार शिंदे किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या पैकी कोणाला होणार हे आजच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर दिसून येईल परंत्तू हा खर्च कोणत्या पक्षाच्या खात्याच्या नावावर टाकायचा हा प्रश्न सुद्धा येणाऱ्या दिवसात निवडणूक आयोगा पुढे निर्माण होणार आहे. पुढे कोल्हापूर, सातारा, पुणे आणि रायगड येथे सुद्धा राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे राहणार आहे. त्यामुळे राज ठाकरे हे महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5