Skip to content Skip to footer

शिरूर तर घेणार पण मावळ आणि बारामती सुद्धा खेचुन आणणार – सुलभ उबाळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, मालिकेसाठी स्पॉन्सरशीप पाहिजे होती म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, कोल्हे यांचे संभाजी महाराजांवरील प्रेम केवळ दाखवायचे आहे. दोन दिवसांपासून अनेक जण सांगतात की राष्ट्रवादीची सगळी फौज मावळ, शिरूरमध्ये आली आहे, पण शिरूर तर घेणारच पण मावळ बारामतीसुद्धा सोडणार नाही, असा घणाघात शिवसेना नेत्या सुलभ उबाळे यांनी केला आहे. शिरूर लोकसभेचे शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेच चाकण येथे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना सुलभ उबाळे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.’

राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुरुवातीला उमेदवार देखील मिळाला नाही, म्हणून अजित पवारांनाचं मी उभारतो म्हणायची वेळ आली. दुसऱ्याचं दिवशी त्यांनी देखील मी असो म्हणालोच नाही म्हणत माघार घेतली. शेवटी राष्ट्रवादीला एका कलाकाराला उमेदवारी द्यावी लागली, अशी टीका सुलभ उबाळे यांनी केली. शिवसेनेचा जन्मच छत्रपतींच्या नावाने झाला आहे, त्यामुळे विरोधकांनी आम्हाला शिकवू नये. अमोल कोल्हे यांनी पन्हाळ गडावर केलेले अश्लील चाळे जनतेने पाहिले आहे. पैशांसाठी अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडत राष्ट्रवादीची चाकरी पत्करली, असा आरोप उबाळे यांनी केला आहे.

Leave a comment

0.0/5