Skip to content Skip to footer

मुंबई, ठाण्यातील जागांबाबत काँग्रेस ‘प्रचंड निराशावादी’?; राष्ट्रीय नेत्यांनी दाखवला ‘हात

लोकसभा निवडणुकीला आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिल्लीतील बड्या काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली आहे. एकीकडे महायुतीचे उमेदवार निवडणून आणण्यासाठी दिल्लीतील भाजपा पक्षाच्या अध्यक्षा पासून ते थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील सभांना हजेरी लावलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा महाराष्ट्रात तीन सभा घेतलेल्या आहे. परंतु काँग्रेसने आगामी लोकसभा निवडुकीला आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी हवी तेवडी मेहनत घेतलेली दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांचा प्रचार राम भरोसे असतानाच दिसत आहे.

आज प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो होणार होता पण तोदेखील झाला नाही. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी देशात काही ठिकाणी सभांना संबोधित करीत आहेत. राहुल गांधी यांच्या प्रचाराचा झंझावात देशभर सुरू आहे. मात्र, काँग्रेसच्या प्रचाराचे मुख्य आधारस्तंभ असलेले हे दोन्ही नेते मुंबईत प्रचाराला आले नाहीत. प्रियंका गांधी यांनी प्रचारात स्वत:ला उत्तर प्रदेशपुरतेच यंदा मर्यादित ठेवले. मुंबई काँग्रेसमधील एकमेकांशी भांडणाऱ्या नेत्यांकडे पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले असा त्याचा अर्थ लावला जात आहे.

राष्ट्रीय नेत्यांनी मुंबईत येऊन प्रचार केलाच पाहिजे यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा वा दिल्लीत वजन असलेल्यांनी एकतर आग्रही भूमिका घेतली नाही किंवा घेतली असेल तर त्यांचे तितके वजन पडले नाही. काँग्रेसचे घटकपक्ष असलेल्या ओमर अब्दुल्ला, तेजस्वी यादव, सचिन पायलट अशा नव्या पिढीच्या नेत्यांना आणून मुंबईत वातावरण तयार करता आले असते पण ती संधीदेखील काँग्रेसने गमावली. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोजक्याच सभा घेतल्या. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापुरातील मतदानानंतर येथे आले नाहीत. नवज्योत सिद्धू यांचा कार्यक्रम ठरला, पण ते आलेच नाहीत.

Leave a comment

0.0/5