Skip to content Skip to footer

हिंदू शब्द मुघलांच्या आधी अस्तित्त्वातच नव्हता कमल हसन यांचे वादग्रस्त विधान.

काही दिवसा पासून हिंदू विरोधी भूमिका मांडून फुकटचा अंगावर रोष ओढावून घेणाऱ्या आणि प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करणारे अभिनेते कमल हसन यांनी पुन्हा हिंदू विरोधी +विधान केले आहे. आता कमल हसन पुन्हा एकदा बरळल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वक्तव्य कमल हसन यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर कमल हसन यांनी प्रत्येक धर्मात दहशतवादी असल्याचे वक्तव्य करून वादात आणखी भर घातली होती. आता त्यांनी हिंदू हा शब्द मुघल आणि परकीय आक्रमणाआधी अस्तित्त्वातच नव्हता असे वक्तव्य करून आगीत तेल ओतले आहे.

कमल हसन यांनी तामिळ भाषेत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन धर्मग्रंथात आढळत नाही असे म्हटले आहे. हिंदू हा शब्द परदेशी आक्रमकांनी आणि मुघलांनी दिला आहे. परकीयांनी दिलेली ही ओळख जपण्यापेक्षा आपण भारतीय ही ओळख जपली पाहिजे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हिंदू हा शब्द धर्मासाठी वापरणे अयोग्य आहे, आपण सगळे भारतीय आहोत. आपली ओळख भारतीयच असली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. शैव, वैष्णव किंवा शाक्त पंथीयांच्या ग्रंथात किंवा इतर प्राचीन धर्मग्रंथांत कुणीही हिंदू या शब्दाचा उल्लेख आढळत नाही. मुघल आणि परकीय आक्रमणाआधी हा शब्दच अस्तित्त्वात नव्हता. ब्रिटिशांच्या राजवटीत त्यांनी हिंदू हा शब्द प्रचलित केला असेही त्यांनी म्हटले आहे

Leave a comment

0.0/5