Skip to content Skip to footer

सत्तेत “फिर एक बार मोदी सरकार” दिसेल – उद्धव ठाकरे

 काँग्रेस, महाआघाडी किंवा कोणीही काहीही म्हणू देत, देशातील जनतेने मात्र “फिर एक बार मोदी सरकार” च्या घोषणेवर शिक्कामोर्तब केले आहे. २३ तारखेला ते दिसेलच असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केला आहे. आजच्या अग्रलेखात लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराच्या पातळीविषयी भाष्य करण्यात आलं आहे. ३८ दिवसांच्या प्रचार काळात सर्व पक्षीय नेत्यांनी प्रचाराचा ‘शिमगा’ केल्याने सार्वत्रिक निवडणुकांना लोकशाहीचा पवित्र सण का म्हणायचे? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
                         ३८ दिवसांच्या प्रचार काळात सर्व पक्षीय नेत्यांनी प्रचाराचा ‘शिमगा’ केल्याने सार्वत्रिक निवडणुकांना लोकशाहीचा पवित्र सण का म्हणायचे, हा तसा प्रश्नच आहे. तथापि मतदानाचा घटनात्मक हक्क बजावून जनतेला हवे ते राज्यकर्ते सत्तेत बसवण्याची, देशाचे भवितव्य सुरक्षित करण्याची हीच संधी असते. तेव्हा प्रचाराची पातळी वगैरे घसरली असली तरी आता या प्रचाराच्या तोफा शांत झाल्या आहेत. टीव्हीच्या पडद्यावरून कानाच्या पडद्यावर आदळणारे गोंगाटाचे थेट प्रक्षेपणही थांबले आहे.  दिल्लीच्या तख्तावर कोण विराजमान होणार याचा फैसला करणारी ही निवडणूक असल्याने अटीतटीचा प्रचार होणार हे अपेक्षितच होते. मात्र त्याही पलीकडे प्रचाराची पातळी घसरली. असे मत सुद्धा सामानाच्या अग्रलेखातून मांडण्यात आलेले आहे.
                      सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हिंसेचा सुद्धा समाचार घेण्यात आलेला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेला हिंसक प्रकार तर गंभीरच होता. शेवटी येथेही निवडणूक आयोगालाच प. बंगालमधील प्रचाराचा कालावधी एक दिवसाने कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा लागला. तथापि मतदानाचा घटनात्मक हक्क बजावून जनतेला हवे ते राज्यकर्ते सत्तेत बसवण्याची, देशाचे भवितव्य सुरक्षित करण्याची हीच संधी असते. आता  टीव्हीच्या पडद्यावरून कानाच्या पडद्यावर आदळणारे गोंगाटाचे थेट प्रक्षेपणही थांबले आहे. असभ्य भाषा, शिवीगाळ, टोकाचा द्वेष पसरवणारा प्रचार संपला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a comment

0.0/5