Skip to content Skip to footer

निकालाच्या दोन दिवसा आधी अमित शाह यांची भाजपा मित्र पक्षाबरोबर डीनर पार्टी

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या मतदाना नंतर प्रसार माध्यमांनी दाखविलेल्या एक्सझिट पोलच्या सर्वेक्षणा नुसार भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षा मध्ये विजयाचे वातावरण आहे. एक्सझिट पोलच्या निर्णया नुसार देशात पुन्हा भाजपाचे सरकार येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवसा आधीच भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली. बैठकीनंतर डीनर पार्टी होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.
             ही बैठक संध्याकाळी ७ वाजता अशोका हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. यावेळी सर्वांना डीनर देण्यात येणार असून बैठकीला २९ नेत्यांना बोलविण्यात आले आहे. या बैठकीपूर्वी ४ वाजता भाजपा मुख्यालयात मंत्री परिषदेच्या सदस्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह बैठक घेणार आहेत. भाजपा नंतर शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. २०१४ मध्ये शिवसेनेने भाजपसोबत मिळून १८ जागांवर विजय मिळवला होता.

Leave a comment

0.0/5