Skip to content Skip to footer

“हा ठाकरे घराण्याचा करिष्मा” केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची पहिली प्रतिक्रिया……

गुरुवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील सात नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला चार कॅबिनेट मंत्रिपदं आणि तीन केंद्रीय राज्यमंत्रीपदं आली आहेत. कॅबिनेट मंत्रिपदामध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची वर्णी लागली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा ठाकरे घराण्याचा करिष्मा आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

एक खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना केंद्रीय मंत्री अरविंद सावंत म्हणाले, मंत्रिपद मिळणे हा ठाकरे घराण्याचा करिष्मा आहे. म्हणजे बघा ना मनोहर जोशी समोर मंचावर शपथ घेत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खाली बसले होते आणि मी आता शपथ घेतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खाली बसले होते. हा ठाकरे घराण्याचा मोठा करिष्मा आहे. जे घडवायचं आपण पण त्याचा आस्वाद घ्यायचा नाही, म्हणजे किती मोठा त्याग, किती मोठं मन असेल ना, असेही ते म्हणाले.

मोदींच्या मंत्रिमंडळात २४ कॅबिनेट मंत्री व ३४ राज्यमंत्र्यांचा समावेश शिवसेनाप्रमुखांच्या आठवणीत अरविंद सावंत म्हणाले, मंत्रिपदाची शपथ घेतानाही वाटत होते शिवसेनाप्रमुख जवळ आहेत. त्यांनी मला ही संधी दिली आहे. आज साहेब हवे होते. डोके त्यांच्या पायावर ठेवले असते. पायावर डोके ठेवताना जी पाठीवर थाप मिळायची ती लढायची उब देऊन जायची. असा निर्मोही नेता मी आजपर्यंत पाहिला नाही.

Leave a comment

0.0/5