Skip to content Skip to footer

पश्चिम बंगाल मध्ये हुकूमशाही, भाजपा ऑफिसवर ममता दीदींनी केला हल्ला…..

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात पश्चिम बंगाल मध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रचार रॅली दरम्यान तृणमूल काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी हौदोस घातला होता. त्यामुळे ना-इलाजाने अमित शहा यांना दौरा अर्धवट सोडून दिल्लीत परतावे लागले होते. त्यानंतर २३ मे रोजी लागलेल्या निकालात तृणमूलच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हा पराभव ममता दीदींच्या जास्त जिव्हाळी लागलेला दिऊन येत होता. याच पार्श्वभूमीवर उत्तर परगणा येथील भाजप कार्यालयावर ममता दीदींनी हल्लाबोल केला. कार्यालयाचे कुलूप तोडले. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी कार्यालयाच्या दरवाजावर तृणमूलचे चिन्ह रंगवत ते त्यांच्या पक्षाचे कार्यालय असल्याचा दावाही केला आहे.

नवी दिल्लीमध्ये ३० मे रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्री मंडळाबरोबर शपथ घेत होते. त्याचवेळी परगना जिल्ह्यात ममता बॅनर्जीं आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन करत होत्या. त्यानंतर नैहाटी येथे भाषण दिल्यानंतर दीदींनी आपला मोर्चा भाजपा कार्यालयाकडे वळवला. पण कार्यालयाला कुलूप असल्याने दीदी भडकल्या. त्यांनी कार्यकर्त्यांना कुलूप तोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर दीदींनी दिलेल्या सूचनेनुसार कार्यालयातील भगवा रंग आणि कमळाचे चिन्ह हटवण्यात आले. नंतर तृणमूल कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नंतर दीदींनी दरवाजावर तृणमूलचे चिन्ह काढले व बाजूला पक्षाचे नाव लिहित भाजपा कार्यालयावर ताबा मिळवल्याचा इशारा केला.

Leave a comment

0.0/5