Skip to content Skip to footer

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याची ‘एबीपी माझा’ने बिनशर्त माफी मागावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन करू – खा. राहुल शेवाळे

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने प्रक्षेपित केलेला कार्यक्रम म्हणजे थोर क्रांतिकारकाचाअवमानआहे. हा कार्यक्रम प्रक्षेपित करणारी एबीपी माझा ही वृत्तवाहिनी काँग्रेस पक्षाची एजंट असल्याचा जनतेचा आरोप आहे. या केलेल्या विधाना बद्दल एबीपी ने बिनशर्त माफी मागावी आणि संबंधित कार्यक्रम सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म वरून त्वरित हटवावा, अन्यथा मोठ्या जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल” अशा शब्दांत खासदार राहुल शेवाळे यांनी एबीपी वहिनीला इशारा दिला. सावरकरां विषयीच्या आक्षेपार्ह कार्यक्रमाच्या विरोधात सावरकरांचे नातू रणजित सावरकर, खासदार राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी एबीपी माझाच्या कार्यालयात जाऊन लेखी निवेदन सादर केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारा कार्यक्रम ‘एबीपी माझा’ने प्रसारित केल्यावर समाजाच्या सर्वच स्तरांतून मोठी टीका झाली होती. त्यानंतर या वृत्तवाहिनीने सावध भूमिका घेत केवळ कार्यक्रमाच्या नावाविषयी दिलगिरी व्यक्त केली. परंतु सावरकरांचा अवमान करणाऱ्या वाहिनीने बिनशर्त माफी मागावी आणि हा कार्यक्रम सगळ्या डिजिटल मीडियावरून काढून टाकावा, या मागणीसाठी खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्त्वाखाली एका शिष्टमंडळाने एबीपी कार्यालयात जाऊन कार्यकारी निर्माता श्री. तुळशीदास भोईटे यांना निवेदन दिले. यावर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन भोईटे यांनी या शिष्टमंडळाला दिलेले आहे.

Leave a comment

0.0/5